Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिलांवरील अत्याचार (Crime Against Woman) दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच एक संतापजनक घटना चिंचवड पोलीस ठाण्याच्या (Chinchwad Police Station) हद्दीत घडली आहे. एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने साडेचार वर्षाच्या चिमुरडीवर (Minor Girl) लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या विरोधात IPC 376, 376 अ, ब, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (The Prevention of Child Sexual Abuse Act) 2012 चे कलम 3 सह 4,11 सह 12 नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Pimpri Crime) करण्यात आला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने (वय – 32) चिंचवड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.17) फिर्याद दिली आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 16) चिंचवड येथे सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत घडला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घराबाहेर गेली असताना त्यांची साडेचार वर्षाची मुलगी आणि मुलगा घरी होते. त्यावेळी अल्पवयीन 16 वर्षाचा मुलगा फिर्यादी यांच्या घरी आला. त्यानंतर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले (Pune Crime). फिर्यादी महिला घरी आल्यानंतर पीडित मुलीला त्रास होत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे फिर्यादीने मुलीला विचारले असता, लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कुदळे (PSI Navnath Kudale) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | 16 year old boy sexually assaulted minor girl in pimpri chinchwad pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा