Pune Minor Girl Rape Case | मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला मारहाण करुन वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत खराडी, वाघोली येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने गुरुवारी (दि.22) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मयुर संजय केंद्रे
Mayur Sanjay Kendre (वय-24 रा. खांदवेनगर, लोहगाव पुणे) याच्यावर आयपीसी 363, 376, 376/2/द, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीला वाघोली आणि खराडी येथे बोलावून घेतले.(Pune Minor Girl Rape Case)

पीडित मुलगी त्याठिकाणी आली असता तिला एका महिलेच्या घरी घेऊन गेला.
त्याठिकाणी तिला शिवागाळ करुन मारहाण केली.
तसेच मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध
प्रस्थापित केले. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी
आरोपीने दिले. दरम्यान, पीडित मुलगी चार महिन्याची गरोदर राहिली.
आरोपीने हा प्रकार लपवण्यासाठी मुलीवर गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray-Manohar Joshi | मनोहर जोशींच्या निधनानंतर राज ठाकरेंचा शोकसंदेश, ”शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न…”

BJP MP Raksha Khadse | नाथाभाऊंच्या भाजपा घरवापसीबाबत रक्षा खडसेंचे सूचक वक्तव्य, ”बरेच लोकांचीही इच्छा…”

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, वाकड परिसरातील घटना; तिघांना अटक

Lok Sabha Election 2024 | पिंपरी : जास्त बुथ संख्या असलेल्या मतदान केंद्रांची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil | ”…तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”; छगन भुजबळांची मागणी, प्रकरण काय?