Pune Minor Girl Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape In Pune) करण्यात आला. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

याबाबत एका १५ वर्षाच्या मुलीने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४८/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उमेर पटेल (वय २२, रा. नाना पेठ) याला अटक केली आहे. हा प्रकार लष्कर व नाना पेठेत २०२० ते मे २०२२ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेर पटेल याने फिर्यादी हिला भेटून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणून लष्कर भागातील घरी तिचा जबरदस्तीने किस घेऊन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
त्यानंतर मे २०२२ मध्ये पटेल तिच्या घरी आला. तिच्यावर बलात्कार केला.
या कृत्यातून ही मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले.
त्यानंतर तिने आता पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबके तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | A minor girl was raped by luring her into marriage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा