Pune Minor Girl Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पुण्यातील घटना

0
332
Pune Minor Girl Rape Case | abuse of a minor girl with the lure of marriage
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. तसेच व्हिडिओ आणि फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी (Threat) दिल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी 24 वर्षाच्या तरुणावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. (Pune Minor Girl Rape Case)

ADV

याबाबत पीडित मुलीच्या आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी हणमंत किसन सांगळे Hanmant Kisan Sangle (वय-24 रा. गणेशनगर, वाघोली) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2021 ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवले. तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये काढलेले व्हिडिओ आणि फोटो मुलीच्या मोबाईलवर पाठवले.

यानंतर घाबरलेल्या मुलीने आरोपीसोबतचे संबंध तोडले. यानंतर सांगळे याने मुलीला धमकावले.
माझ्याशी संबंध न ठेवल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. आईने पोलिसांकडे धाव घेत सांगळे विरुद्ध तक्रार दिली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भदे करीत आहेत.

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | abuse of a minor girl with the lure of marriage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी तयार, लवकरच दिल्लीतून घोषणा – चंद्रकांत पाटील

Uddhav Thackeray | ठाणे दौऱ्यावर येताच, उद्धव ठाकरे यांचे शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र; म्हणाले… (व्हिडीओ)