क्राईम स्टोरीताज्या बातम्यापुणे

Pune Minor Girl Rape Case | ‘इंस्टाग्राम’वर मैत्री झालेल्या मित्राने शारीरीक संबंध ठेवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण करुन शारीरीक संबंध (Physical Contact) ठेवून अल्पवयीन मुलीला (Pune Minor Girl Rape Case) गर्भवती (Pregnant) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वडगाव (Wadgaon) येथील एका ३० वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४१/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रोहन मनू दास (Rohan Manu Das) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

हा प्रकार आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) येथील श्री गंगा गॅलेक्सी इमारतीच्या (Sri Ganga Galaxy Buildings) टेरेसवरील पत्र्याच्या खोलीत व इतर ठिकाणी मार्च ते मे २०२२ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १५ वर्षाशी मुलगी तिची इंन्स्टाग्रामवर (Instagram) रोहन मनू दास याच्याशी जानेवारीमध्ये ओळख झाली.
ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे बाहेर एकमेकांना भेटू लागले.
त्यातूनच त्याने मुलीचा विरोध असताना देखील तिच्यासोबत शारीरीक संबंध निर्माण केले.
त्यातून ती गर्भवती राहिली. तेव्हा हा प्रकार समोर आला.
तिच्या आईने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली असून पोलीस उपनिरीक्षक घोगरे (Sub-Inspector Of Police Ghogare) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | An Instagram friend made a minor girl pregnant by having physical relationship

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button