Pune Minor Girl Rape Case | पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; नग्न अवस्थेतील फोटो काढून केले व्हायरल

पुणे : Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिचे नग्न अवस्थेतील फोटो (Nude Photo) काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार (Pune Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. (Pune Minor Girl Rape Case)

ओम राजु तिंबोळे (रा. जय गणेश कॉलनी, विधाते वस्ती, औंध), जय राजु तिंबोळे, अनिल जाधव, सुनिल जाधव, शुभम आणि किरण जावळे (सर्व रा. औंध) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ही घटना विशालनगर येथील लॉजवर, बाणेर येथील तुकाई मंदिर टेकडी तसेच औंध येथील कबुतराचे रुममध्ये जुलै ते २३ डिसेबर २०२२ दरम्यान घडली आहे. पोलिसांनी या सर्वांवर पोक्सोसह अनुसुचित जाती जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका १५ वर्षाच्या मुलीला अनिल जाधव याने चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने तिचे अपहरण केले. तिच्यावर बलात्कार केला.
तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून ते आपल्या मित्रांमध्ये प्रसारित केले.
त्यानंतर तिचे हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिच्यावर अत्याचार केले.
२३ डिसेबर रोजी दुपारी तिला एका ठिकाणी बोलावून सहा जणांनी तिच्या सामुहिक बलात्कार केला.
या अत्याचाराचा तिला त्रास होऊ लागल्याने ही घटना तिच्या आईला समजली.
त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली असून पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.
सहायक पोलीस आयुक्त अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Minor Girl Rape Case | Gang Rape Case Minor Girl Aundh Baner Pune Crime News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | गुंडाने भरदिवसा रस्त्यावरुन उचलून नेऊन 12 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; जनता वसाहतीत घडलेली घटना

Amruta Fadnavis | रंगपंचमीचे फोटो शेअर करत अमृता फडणवीसांनी केली ‘नॉटी’ कमेंट, दिल्या शुभेच्छा