Pune Minor Girl Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीवर अत्याचार करुन केले गर्भवती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन युवती बरोबर प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण करुन तिला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केले. त्यातून ही युवती गर्भवती (Pregnant) राहिली आहे. हा धक्कादायक प्रकार (Pune Minor Girl Rape Case) वारजे परिसरात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 23 वर्षाच्या तरुणावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याप्रकरणी पाटील इस्टेट (Patil Estate) येथील एका 17 वर्षाच्या युवतीने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राकेश निरगुनकर Rakesh Nirgunkar (वय 23, रा. करमोळी, तानाजी पाटीलनगर, पौड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वारजे परिसरातील एका पत्र्याच्या खोलीत, पौड मधील तानाजी पाटीलनगरातील करमोळी येथे डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश निरगुनकर याने फिर्यादी यांचा पाठलाग करुन तिच्याबरोबर ओळख करुन घेतली.
तिच्याबरोबर प्रेमसंबंध निर्माण केले. मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण दोघे लग्न करु,
असे आमिष दाखवून तिच्यावर वारजे येथे तसेच पौड येथील घरी शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले.
त्यातून ही युवती गर्भवती राहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर या युवतीने पौड पोलीस ठाण्यात (Paud Police Station) फिर्यादी दिली होती.
तेथून तो वारजे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Pretending to be pregnant by torturing a minor girl by showing the lure of marriage Pune Minor Girl Rape Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार; ‘हे’ आहे कारण…

 

Ration Card Portability Scheme | गरिबांसाठी संपूर्ण देशात ‘ही’ योजना लागू, शेवटी सहभागी झाले ‘हे’ राज्य

 

Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेनेचे आणि अपक्ष आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात का निघालेत हे लवकरच समजेल’ – संजय राऊत