Pune Minor Girl Rape Case | ‘त्या’ अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी केला बलात्कार, आणखी 6 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुण्यातील वानवडी परिसरामध्ये एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक अत्याचार (Pune Minor Girl Rape Case) केल्याची घटना घडली आहे. पुण्यात घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. वानवडी गँगरेप प्रकरणात (Pune Minor Girl Rape Case) आता नवी माहिती समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर एकूण 13 जणांनी बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी (wanwadi police) आणखी 6 जणांना अटक (Arrest) केली आहे.
वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पीडित मुलगी पुणे स्टेशन (Pune station) येथे आली होती. परंतु रात्री उशिरा गाडी नसल्याने तिला राहण्याची व्यवस्था करतो असे सांगून रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेतले. तिला रिक्षातून वानवडी परिसरात नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. सुरुवातीला 6 रिक्षाचलक आणि 2 रेल्वे कर्मचारी यांनी मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली होती.
संतापजनक माहिती समोर
वानवडी पोलिसांनी केलेल्या तपासात संतापजनक माहिती समोर आली आहे. वानवडी पोलिसांनी आणखी 6 जणांना अटक केली आहे. यापैकी 5 जणांनी बलात्कार केला होता. एकूण 13 जणांनी पीडितेवर अत्याचार केला आहे. तर मुलीला मुंबईहून (Mumbai) सोबत घेऊन जाणाऱ्या तिच्या अल्पवयीन मित्राला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्या रात्री नेमकं काय घडलं?
पीडित 13 वर्षाची मुलगी आई वडिलांसोबत वानवडी मध्ये राहते. 31 ऑगस्टच्या रात्री तिचा मित्र गावाहून तिला भेटण्यासाठी पुणे स्टेशन येथे येणार होता. त्याला भेटण्यासाठी पीडित मुलगी पुणे स्टेशन येथे आली होती. मात्र, तिचा मित्र आलाच नाही. त्यानंतर तिने बाहेर उभ्या असलेल्या रिक्षा चालकाला पुन्हा गाडी आहे का ? याची विचारणा करण्यासाठी गेली असता त्याने तिला घरी सोडण्याचा बहाणा करून रिक्षात बसवले. त्यानंतर त्याने आपल्या साथिदारांना फोन करुन बोलावून घेतले.
आरोपींनी दोन दिवस पीडित मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर मुलीला मुंबईच्या बसमध्ये बसवून देण्यात आलं होतं.
दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसांत केली.
मुलीला चंदीगडहून घेतलं ताब्यात
आरोपींनी मुलीला मुंबईच्या गाडीत बसवून तिला मुंबईला पाठवून दिले.
तिथे तिचा मित्र आला होता. त्यानंतर ते चंदीगडला (Chandigarh) गेले.
पोलिसांनी लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक चंदीगडला विमानाने रवाना झाले. त्याठिकाणी मुलीला ताब्यात घेतले.
पोलीस हे मिसिंगचा तपास करत असताना पुणे स्टेशनवरच्या सीसीटीव्ही मध्ये मुलगी रिक्षात बसताना दिसली.
त्या रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याने तेव्हाच पोलिसांना मुलीवर बलात्कार केल्याची माहिती दिली.
पोलिसांनी आरोपींना अटक केली. परंतु मुलगी मिळून येत नसल्याने पोलीस गोंधळले होते.
अखेर तांत्रिक लोकेशन मिळाल्यावर मुलीला ताब्यात घेण्यात आले.
Web Title : Pune Minor Girl Rape Case | pune gang rape minor girl was raped by 13 people 6 more arrested
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
BPCL च्या घरगुती गॅस ग्राहकांना खासगीकरणानंतर सुद्धा मिळत राहील सबसिडी
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 176 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी