Pune Minor Girl Rape Case | 17 वर्षीय मुलीला गोड बोलून दाखवलं ‘काम’, बलात्कार प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीबरोबर शारीरीक संबंध (Pune Minor Girl Rape Case) ठेवून तिला गर्भवती (Pregnant) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी बिबवेवाडी येथील एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८९/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजित बापू कांबळे Ajit Bapu Kamble (वय २५, रा. जाधववाडी, भोसरी – Bhosari ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२१ पासून मार्च २०२२ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरी कोणी नसताना आरोपी त्यांच्या घरी आला.
फिर्यादी यांच्या १७ वर्षाच्या मुलीशी गोड बोलून तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी वेळोवेळी जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवले.
यातून ती गर्भवती राहिली. ही बाब या मुलीने कांबळे याला सांगितली, तेव्हा त्याने तिला गर्भपात करायला सांगितले.
ही बाब तिने घरात सांगितली नव्हती.

 

मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता ती २१ आठवड्याची गर्भवती असल्याचे समजले.
त्यानंतर तिच्याकडे फिर्यादीने चौकशी केल्यावर तिने सर्व प्रकार सांगितला. पोलीस उपनिरीक्षक गादीलवाड तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Pune Minor Girl Rape Case Bibvewadi Police Registered Case On Ajit Bapu Kamble Bosari

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा