Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी (Pune Minor Girl Rape Case) दोषी आरोपीला पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.के. जहागीरदार (Pune Sessions Court Judge K.K. Jahagirdar) यांनी मरेपर्यंत जन्मठेप (Life Imprisonment) आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. छबी मोहन सोनी Chhabi Mohan Soni (वय-25 रा. किरकटवाडी ता. हवेली मुळ रा. उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 

आरोपीने ओळखीचा फायदा घेत चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीची प्रकृती खालावल्याने तीला खासगी रुग्णालयात दाखल केले असता हा प्रकार उघडकीस आला. 2019 साली मुलीच्या आईने हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Child Sexual Abuse Act) गुन्हा (FIR) दाखल केला होता. त्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला हवेली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke)
यांच्या पथकाने पुणे रेल्वे स्थानकावरुन (Pune Railway Station) ताब्यात घेतले होते.

पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी या प्रकरणाचा तपास करत पुरावे गोळा केले.
न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे सोनी याला दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याच्या न्यायालयीन कामकाजात सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील (API Arjun Ghode Patil),
विद्याधर निचित (Vidyadhar Nichit) व पोलीस हवालदार सचिन अडसूळ (Police Constable Sachin Adsul) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Pune Minor Girl Rape Case Criminal life imprisonment pune sessions court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात भाजपच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीचे आप्पा जाधव यांच्या कार्यालयावर हल्ला, प्रचंड खळबळ

 

Jayant Patil | ‘छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाबद्दल जे बोलतात ते जनतेपर्यंत पोहोचवा…’, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आदेश 

 

Pune Crime | वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून महावितरण कार्यालयाची तोडफोड, कोंढव्यातील घटना

 

PMC Building Construction Development | महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उत्पन्न यंदा घटण्याची शक्यता ! पहिल्या दोन महिन्यांत अपेक्षेपेक्षा पन्नास टक्केच उत्पन्न