Pune Minor Girl Rape Case | 15 वर्षीय मुलीवर 25 वर्षाच्या नराधमाकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; स्वारगेट परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने पळवून नेले. पोलिसांनी तिला परत घरी आणले. तेव्हा तिची वैद्यकीय तपासणी करताना तिच्यावर शेजारी राहणार्‍या तरुणाने वारंवार अत्याचार (Rape In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुलटेकडी (Gultekdi) येथील मिनाताई ठाकरे औद्योगिक वसाहतीत राहणार्‍या एका १५ वर्षाच्या मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६४/२२) दिली आहे. त्यावरुन तिच्या शेजारी राहणार्‍या २५ वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी  १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजयंती कार्यक्रमासाठी शाळेत साडी नेसून गेली होती. शाळेतून घरी येऊन साडी बदलत असताना तिच्या शेजारी राहणारा तरुण घरात शिरला व त्याने तिची साडी काढून तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर बर्‍याच वेळा त्याने तिच्याबरोबर शारीरीक संबंध करुन ही बाब कोणाला सांगितली तर मारुन टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. (Pune Minor Girl Rape Case)

 

दरम्यान, फिर्यादी यांना त्याच्या मित्राने फूस लावून मुंबई येथे पळवून नेले होते. फिर्यादीच्या वडिलांनी स्वारगेट पोलिसांकडे त्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी या मुलीचा शोध घेऊन तिला परत आणले. तिला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले. यावेळी डॉक्टरांनी चौकशी केल्यावर तिने आपल्या शेजारी राहणार्‍या तरुणाने आपल्यावर अनेक वेळा अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या तरुणाला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा  

Web Title : –  Pune Minor Girl Rape Case | Rape On Minor Girl In Swargate area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा