Pune Minor Girl Rape Case | बहिणीच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Pune Minor Girl Rape Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे बहिणीच्या कंपनीतील मित्राने घरात घुसून मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केले. आरोपी संतोष बाबासाहेब अंबाड Santosh Babasaheb Ambad (वय-27) याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) IPC 376(6),45,5,06 सह बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत (Child Sexual Abuse Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

याबाबत पीडित मुलीने शनिवारी (दि.21) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास फिर्यादी मुलीच्या राहत्या घरात घडली. पोलिसांनी संतोष अंबाड (वय-27 रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याला अटक (Arrest) केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलीच्या बहिणीच्या कंपनीमध्ये कामाला आहे. मुलगी घरामध्ये एकटी असताना आरोपी घरात घुसला. त्याने फिर्यादी सोबत जबरदस्ती करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Sexual abuse of a minor girl by a sister’s friend

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raj Thackeray Pune Sabha | राज ठाकरेंचा घणाघात, म्हणाले – ‘शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर…’ (व्हिडीओ)

 

Raj Thackeray Pune Sabha | राज ठाकरे यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले – ‘माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध हा व्यापक कटाचा भाग’

 

Pune Crime | दुचाकीच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यु; अल्पवयीन मुलासह दुचाकीमालकाविरोधात गुन्हा दाखल