Pune Minor Girl Rape Case | 17 वर्षाच्या मुलीवर लैगिंक अत्याचार, लातूरच्या श्रावण साळुंखे विरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात FIR

पुणे : Pune Minor Girl Rape Case | पुण्यातील अल्पवयीन मुलीशी सामुदायिक विवाह सोहळ्यात (Community Marriage Ceremony)  लग्न करुन आत्महत्येची धमकी (Suicide Threat) देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relations) ठेवून तिला गर्भवती (Pregnant) करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police ) श्रावण साळुंखे (रा. लातूर) (Shravan Salunkhe) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार १५ एप्रिल ते सप्टेबर २०२२ दरम्यान सुरु होता.

याबाबत फुरसुंगीमधील (Fursungi) एका १७ वर्षाच्या मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२९९/२२) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रावण साळुंखे याने एका १७ वर्षाच्या मुलीला हडपसरमधून
चाकण येथे नेले. तेथून लातूर (Latur) येथील स्वत:च्या गावी घेऊन केला.
तेथे सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये त्याने फिर्यादीबरोबर जबरदस्तीने लग्न केले.
आरोपीने आत्महत्या करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.
त्यातून फिर्यादी गर्भवती राहिली.
त्यानंतर ती पुण्यात आली असताना तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर तिने फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक डमरे (Police Sub-Inspector Damre)
तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Sexual assault on 17-year-old girl, FIR lodged against Shravan Salunkhe of Latur in Hadapsar police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा