Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक ! वडिलांनीच केला 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; अल्पवयीन असतानाही मनाविरुद्ध लग्न ठरवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | वडिलांनीच 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Father Rape On Minor Girl) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन अंसतानाही लग्न करायचे नसतानाही तिच्या मनाविरुद्ध लग्न ठरविल्याने शेवटी तिने पोलिसांकडे (Pune Police) धाव घेतली.

याप्रकरणी हडपसरमधील (Hadapsar) साडेसतरानळी (Sade Satra Nali) येथील एका 14  वर्षाच्या मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 590/22) दिली आहे. हा प्रकार त्यांच्या राहत्या घरी 18 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान वारंवार घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिचे वडिल हे तिला वेळोवेळी शारीरीक स्पर्श करुन छळ करीत असत. तिची आई घरी नसल्याचा गैरफायदा घेऊन त्याने फिर्यादीवर फेब्रुवारीमध्ये जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्यानंतर त्याने वारंवार तिच्यावर बलात्कार केला. 3 मार्च रोजी त्याने पुन्हा असा प्रकार केला. या प्रकाराची माहिती तिने आईला सांगितली. आईने वडिलांना जाब विचारला. तेव्हा त्याने तिच्या आईला मारहाण केली. तसेच तक्रार न देण्याची धमकी दिली.

फिर्यादी यांना लग्न करायचे नसतानाही तिच्या मनाविरुद्ध तिचे लग्न ठरवले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.

Web Title :Pune Minor Girl Rape Case | Shocking! 14-year-old girl raped by father; Decided to marry against his will even though he was a minor

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त