Pune Minor Girl Rape Case |धक्कादायक! १३ महिन्याच्या चिमुकलीवर केला अत्याचार; शिवणे येथील घटना

पुणे : Pune Minor Girl Rape Case | पती पत्नी भाजीपाला आणण्यासाठी गेले असताना घरी जेवणासाठी बोलावलेल्या नराधमाने घरात झोपलेल्या १३ महिन्याच्या चिमुकलीवर लैगिंक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police) ओंकार नागेश मोरे Omkar Nagesh More (वय २५, रा. कात्रज) याला अटक (Arrest) केली आहे. ही घटना शिवणे (Shivane Pune) येथील एका सोसायटीत रविवारी दुपारी तीन वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा या कुटुंबाच्या ओळखीचा आहे. त्याला घरी जेवणासाठी बोलावले होते. त्यावेळी पती पत्नी भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्यांची १३ महिन्यांची मुलगी घरात झोपली होती. आरोपी घरात एकटा असताना त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. सहायक पोलीस आयुक्त गलांडे (ACP Galande) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Shocking! A 13-month-old child was molested; Incident at Shivane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा