Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पीडित मुलगी गरोदर राहून तिने बाळाला जन्म दिल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील एक वर्षापासून आरोपीच्या राहत्या घरात घडला आहे.

याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुरज साळवे (रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो अॅक्ट) गुन्हा दाखल केला आहे.(Pune Minor Girl Rape Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आणि आरोपीची एक वर्षापूर्वी ओळख झाली.
त्यांच्यात मैत्री होऊन मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर आरोपीने पीडित मुलीला त्याच्या घरी बोलावून घेतले.
‘तू 18 वर्षांची झाल्यानंतर मी तुझ्यासोबत लग्न करतो’ असे आश्वासन देवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
यानंतर आरोपीने वेळोवेळी पीडित मुलीला घरी बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली.
तिने 9 मार्च रोजी एका मुलाला जन्म दिल्याने हा प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी
सुरज साळवे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amit Shah On Uddhav Thackeray | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान, ”महाराष्ट्रासमोर CAA वर भूमिका स्पष्ट करा”

Merged Villages In PMC | समाविष्ट 34 गावांतील मिळकत कर थकबाकी आणि शास्ती माफीचे आश्‍वासन हे केवळ ‘राजकिय’ फायद्यासाठीच!

FIR On Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांची मोठी कारवाई; 80-90 जणांवर 2 ठिकाणी गुन्हे दाखल