पुण्यात कॅनोलला पोहण्यास गेलेला 12 वर्षाचा मुलगा बेपत्ता

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – जनता वसाहत परिसरात कॅनोलला मित्रांसोबत पोहण्यास गेलेला 12 वर्षाचा मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून मुलाचा शोध घेण्यात येत आहे.

प्रणित दत्ता साबळे (वय 12 रा. गल्ली 83, जनता वसाहत ) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणित आणि त्याचा आणखी एक मित्र दुपारी कॅनोलला पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पोहत असताना प्रणित याला दम लागला आणि तो बुडाला. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. त्यांनंतर दत्तवाडी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवणाकडून मुलाचा शोध घेतला जात आहे.