Pune : MIT ची अपूर्वा गोसावी महाराष्ट्र हेल्थ हॅकाथॉनची मानकरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ बायोइन्जिनियरिंगच्या अपूर्व गोसावी महाराष्ट्र हेल्थ हॅकाथॉन स्पर्धेची मानकरी ठरली.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यात अभिनव उपाय, नवजात जन्माच्या डिव्हाइसच्या नवकल्पना प्रस्तावासाठी तिने हॅकेथॉनच्या ट्रॅक डी मेडिकल डिवाइसेस प्रकारातील हा महत्त्वाचा पुरस्कार आहे. अपूर्वाने संघाचा लोगो आणि विषय सादरीकरणाची रचना केली आहे.

अपूर्वा गोसावी म्हणाली, की “आरोग्य आणि व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोत्तम मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवेचे एकात्मिक ध्येय मिळविण्याच्या उद्देशाने सांघिक काम केले. माझ्यासाठी हा एक विलक्षण अनुभव होता. आम्ही तयार केलेले डिवाइस आरोग्य सेवेसाठी महत्वाचे ठरणार आहे. या संशोधनासाठी डॉ. रेनू व्यास आणि सर्व शिक्षकांचे मोठे सहकार्य लाभले.

दरम्यान, कोपनहेगन बायोइन्फॉर्मेटिक्स हॅकाथॉन 2021 स्पर्धेत एम टेक बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थीनी अणू ओसवालने हिने मेंटरचा निवड पुरस्कार तसेच पीपल चॉईस पुरस्कार जिंकला. आयआयटी दिल्लीच्या दोन टीम सदस्यांसह तिने सीएनएनचा आणि आरएनएन वापर करून एक सखोल शिक्षण मॉडेल तयार केले आहे. या मॉडेलचा वापर टी सेल्सच्या संभाव्य लक्षणाचे भाकित करून लसी विकास आणि कर्करोग प्रतिरोधक क्षमतेच्या क्षेत्रासाठी केला जाईल, असे तिने सांगितले.