पुण्यातील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड ! आ. थोपटेंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं कार्यकर्त्यांचं कृत्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महानाट्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी झाल्यानंतर तीनही पक्षात नाराजीचा सूर निघाला असताना काँग्रेसमध्ये मात्र कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेसचे कार्यलयाची तोडफोड करून रागाला वाट करून दिली आहे. अचानक झालेल्या या तोडफोडमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 30 ते 35 कार्यकर्त्यांनी हा राडा घातला आहे.

आघाडी सरकारच्या मंत्रिमडळाची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादी तसेच शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही जणांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी आपआपल्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून नाराजी व्यक्त केली आहे. तर, अनेक ठिकाणी नगरसेविकांनी राजीनामे दिले आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे संग्राम थोपटे हे तिसर्‍यांदा आमदार म्हणून भोर-वेल्हा विधानसभा मतदार संघातून निवडणून आले आहेत. त्यांचे वडिल आनंतराव थोपटे 2004 ला आमदार होते. यानंतर संग्राम यांनी राजकारणात प्रवेशकरून आमदारकी लढविली आहे. 2006 पासून ते आमदार आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश न करता त्यांना डावलले. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

पुणे शहर व जिल्ह्याचे काँग्रेसचे कार्यालय शिवाजीनगर येथे आहे. काँग्रेस भवनातच शहर व जिल्ह्याचे कार्यालय आहे. दरम्यान, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने कार्यकर्ते नाराज होते. नाराजीचे पडसाद आज उमटले. अचानक साडे पाच वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात प्रवेशकरून मोठ-मोठ्या थोपटे यांच्या नावाने घोषणा देत कार्यालयाची तोडफोड केली. त्याचे चित्रीकरण झाले आहे. दगडाने खिडक्या तसेच दरवाजे तोडण्यात आले आहेत. तसेच, खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

अचानक रहदारीच्या वेळीच झालेल्या या कारवाईमुळे मात्र, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र, तोपर्यंत कार्यकर्ते निघून गेल्याचे सांगण्यात आले. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीसांचा ताफा दाखल झाला असून, काँग्रेसच्या शहरातील ज्येष्ठ नेत्यांनी येथे धाव घेतली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/