Pune : कात्रज परिसरातील एका सोसायटीमध्ये एमएनजीएलच्या पाईपलाईनला आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज परिसरात एका सोसायटीत एमएनजीएलची पाईपलाईनला आग लागल्याची घटना घडली. पण वेळीच अग्निशमन दलाने धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी देखील धाव घेतली.

कात्रज येथे आंबेगाव भागात टेल्को कॉलनी आहे. येथे एमएनजीएलची पाईपलाईनला आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास येथे अचानक आग लागली. नागरिकांनी तात्काळ ही माहिती अग्निशमन दल व पोलिसांना दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस व कात्रज अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तीन फायर बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात जवनांना यश आले.

काही क्षणात आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान याची माहिती मिळताच एमएनजीएलचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. लिकेज होऊन हा प्रकार घडला असावा असा अंदाज आहे. त्याची पाहणी करण्यात येत आहे.