Pune MNS | आवाजाबाबत पुणे पोलिसांनी पत्रक काढले नाही तर… पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भोंग्याबाबत (Azaan Loudspeakers) घेतलेल्या भूमिकेनंतर संपूर्ण राज्यच कामाला लागले आहे. राज ठाकरेंनी 3 मे चा अल्टिमेटम दिल्यानंतर 4 मे च्या आंदोलनाचे देशभरात पडसाद उमटले. जो पर्यंत भोंगा उतरवला जात नाही तोपर्यंत आंदोलन (Agitation) सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे जिल्ह्यात महाआरती, मशिदीसमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावणे, अशा प्रकारची आंदोलने सुरु आहेत. काही भागात याबाबत निवेदनही दिले जात आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या पार्श्वभूमीवर आवाजाबाबत नियमावलीचे पत्र काढले आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) सुद्धा आवाजाबाबत नियमावलीचे पत्र काढावे अशी मागणी पुणे मनसे (Pune MNS) पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात आज मनसे पदाधिकाऱ्यांनी (Pune MNS) पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Commissioner Amitabh Gupta) यांची भेट घेतली. यावेळी माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) आणि पदाधिकारी उपस्थित होते.

भोंग्याच्या वादावरुन मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai CP) यांनी आवाजाबाबत जे पत्र काढले आहे. तसेच पत्र पुणे पोलीस आयुक्तांनी (Pune CP) काढावे. यामध्ये आवाजाची नियमावली दिलेली आहे. अनेक लोकांचे याबाबत फोन येत आहेत. जर पोलिसांनी याबाबत माहिती नाही दिली तर आम्ही पक्ष म्हणून निर्णय घेऊ असे पुण्यातील मनसे (Pune MNS) पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यावर पुढील 10 दिवसात माहिती देतो असे आयुक्तांनी सांगितले. त्यानंतर आम्ही पुढील भूमिका जाहीर करु असे मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Web Title : Pune MNS | if the pune police did not issue a letter regarding the voice mns
office bearers met the Police commissioner amitabh gupta

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला