Pune MNS | मनसेच्या होर्डींगवर ‘कैलासवासी पुणे महानगरपालिका’ उल्लेख, विकासकामावरुन सत्ताधाऱ्यांना टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – आगामी काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका (Pune and Pimpri-Chinchwad Municipal Corporation election) होणार आहेत. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकासकामावरुन आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. मनसेने निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) देखील पुण्यात तळ ठोकून आहेत. याच दरम्यान, पुणे मनसेच्या (Pune MNS) वतीने लावण्यात आलेला फलक चर्चेत आला आहे. पुणे मनसेच्या (Pune MNS) वतीने पुणे महापालिकेचा ‘कैलासवासी पुणे महानगरपालिका’ असा उल्लेख असलेले होर्डिंग लावून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

मनसेकडून पुणे महापालिकेला श्रद्धांजली
पुणे महापालिकेच्या वतीने खराडीतील (Kharadi) जुना मुंढवा रस्त्यावर (Old Mundhwa Road) प्रभाग क्रमांक 4 मध्ये क्रिडांगण व मनोरंज नगरी उभारण्यात आली आहे. याची दुरावस्था झाली असून याबाबत खराडीतील मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या दुर्लक्षाने व गलथान कारभाराविरोधात होर्डिंग लावले आहे. या होर्डिंगवर चक्क महापालिकेला ‘कैलासवासी पुणे महानगरपालिका’ असा उल्लेख करुन श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

 

क्रिडांगणालाच लावला फलक

खराडीमध्ये उभारण्यात आलेल्या क्रीडांगणाची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी फलक लावून प्रशासनाचे व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. उद्यानातील खेळणी तुटलेली असून कमरे एवढे गवत उगवले आहे. तसेच स्वच्छतागृहसाठी पालिकेने केलेला कोट्यावधीचा खर्च पाण्यात गेला आहे. याबाबतचा फलक मनसे कार्यकर्त्यांनी क्रिडांगणालाच लावला आहे.

पालिकेचा हट्ट कोणासाठी
यासंदर्भात मनसेचे अच्युत मोळावडे व अरुण येवले यांनी सांगितले, पालिकेचा एवढा हट्ट ठेकेदारांसाठी आहे की मुलांसाठी केला होता. कोट्यावधी रुपये खर्च करुन उद्याने धूळखात पडून आहेत. क्रीडा साहित्याची स्वच्छतागृहांची तोडफोड झाली आहे. महापालिका केवळ ठेकेदारांसाठी काम करते. याचा आम्ही फलक लावून पुणे महापालिकेला कैलासवासी पुणे महापालिका असा उल्लेख करुन निषेध केला आहे.

Web Title :-  Pune MNS | mention kailasavasi pune municipal corporation mns hoardings pune development works

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,
आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या

Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल