Pune MNS | मनसे पदाधिकारी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या भेटीला; वसंत मोरेंचं ‘एकला चलो रे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune MNS | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसे चर्चेत आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या भोंग्याच्या इशाऱ्यावरुन राज्यात संपूर्ण वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान दुसरीकडे काही नेते नाराज देखील झाल्याचं पाहायला मिळालं. आज (मंगळवारी) पुणे मनसेच्या शिष्ठमंडळाने (Pune MNS) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांची भेट घेतली. सध्या भोंग्याच्या प्रकरणावरुन तापलेल्या विषयावर भेट घेतल्याची चर्चा आहे. भेटीवेळी पुणे मनसे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vansat More) सहभागी नसल्याचे दिसले.

 

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही भेट घेतल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी (Pune MNS) सांगितलं आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) भोंग्याच्या आवाजाच्या पातळीबाबत जे पत्रक काढले आहे तसे पत्रक पुणे पोलिसांनी (Pune Police) काढावे अशी मागणी यावेळी केली गेली आहे. मुंबई पोलिसांनी काढलेल्या पत्रकामध्ये आवाजाबाबत नियमावली जाहीर केले आहेत. या भेटीवेळी शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यासह बाबू वागस्कर (Babu Wagaskar), बाळा शेडगे (Bala Shedge), गणेश सातपुते (Ganesh Satpute) हे यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत वसंत मोरे अनुपस्थित होते. याबाबत विचारले असता, यासंदर्भातील आधीच्या बैठकीला ते उपस्थित होते, आमच्यात काही मतभेद नाहीत असं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, या विषयावर ज्या लोकांना बोलायला लावले आहे तेच लोकं बोलतील असं म्हणत त्यांनी अयोध्या दौऱ्याबद्दल बोलणं टाळलं.

 

दरम्यान, पोलीस आयुक्तांच्या भेटीच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता वसंत मोरे म्हणाले की, ”मी अनुपस्थित असलो तरी मी राजमार्गावर आहे.
राज ठाकरे आले तरच मी शहर कार्यालयात जाईल तसच एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे आणि राजमार्गावर आहे,”
असं वसंत मोरे यांनी सांगितलं.

 

 

Web Title :- Pune MNS | MNS leader meet to pune cp amitabh gupta but vasant more

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा