Pune MNS Office Bearers Resign | मनसेला फटका ! गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पुण्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune MNS Office Bearers Resign | गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS Gudhi Padwa Melawa) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवर भोंगे लावल्यास (Loudspeakers For Azaan) त्याच्या समोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावा, असे आदेश मनसे सैनिकांना दिले होते. त्यावरून राज्यात मोठे वादंग उठले आहे. दरम्यान, मुंबईत मनसेच्या कार्यालयांवर (MNS Office in Mumbai) लाऊडस्पीकर लाऊन हनुमान चालीसा लावण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत लाऊडस्पीकर जप्त केले. मात्र, आता या आदेशामुळे मनसेला मोठा फटका बसला आहे. कारण मनसेमध्ये असणाऱ्या काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे (Pune MNS Office Bearers Resign) दिले आहेत.

 

राज ठाकरेंनी केलेल्या या विधानानंतर पुण्यातील मनसेच्या (Pune MNS) मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी पदांचे राजीनामे दिले आहेत. मनसेच्या वॉर्ड क्रमांक 84 शाखेचे अध्यक्ष माझीद अमीन शेख (Majid Amin Shaikh) यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात असे म्हंटले आहे की, काही दिवसांपासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यांसारखे विषय असताना, या मुद्द्यांना सोडून जात धर्म यावर अधिक भर दिला जात आहे. या कारणामुळे राजीनामा देत असल्याचे शेख यांनी म्हंटले आहे. केवळ शेखच नाही तर अन्य काही मुस्लिम कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. (Pune MNS Office Bearers Resign)

काय म्हणाले होते राज ठाकरे ?
गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ”धर्मांध नाही. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा.
यापूर्वीही मी मशिदीवरील भोंग्या बाबत बोललो होतो. पण अजूनही ते सुरू आहेत.
मात्र यापुढे आता सरकारने मशिदींवरील भोंगे काढले नाही तर मशिदीबाहेर दुप्पट आवाजाने स्पीकर लावू आणि हनुमान चालीसा वाजवू.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत मदरशांवर धाडी टाका, बघा तुम्हाला काय काय सापडेल,” असंही ते म्हणाले.

 

 

Web Title :- Pune MNS Office Bearers Resign | muslim mansainik resign from party after raj thackeray gudhi padwa speech on remove loud spears from mosques masjid mns party worker

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा