Pune MNS | पुणे मनसे : वसंत मोरेंचे खंदे समर्थक निलेश माझीरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune MNS | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (MNS Chief Raj Thackeray) मशिदींवरील भोंग्याच्या भूमिकेवरुन राज्यासह पुण्यातील काही मनसे (Pune MNS) कार्यकर्ते, पदाधिका-यांनी राजीनामे (Resignation) दिले आहेत. तेव्हापासून मनसे पक्षात धक्कातंत्र पाहायला मिळत आहे. अशातच आता पुण्यात आणखी एक मनसेला धक्का बसला आहे. मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे (Nilesh Mazhire) यांनी मनसे पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे पुणे मनसे पक्षात खळबळ उडाली आहे.

 

निलेश माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांचे कट्टर समर्थक मानले जातात. वसंत मोरे यांनी मागील काही दिवसात नाराजी दर्शवली होती. त्यानंतर माझीरे पक्षातून बाजूला झाल्यानंतर आता मनसेला हा पुण्यातील मोठा धक्का मानला जात आहे. “मी आज पक्ष सोडण्याचं मुख्य कारण म्हणजे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) आणि राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर (Babu Wagaskar) तसेच कोअर कमिटीतील इतर सदस्य आहेत” असं सांगत माझिरे यांनी पक्ष सोडण्याचं म्हटलं आहे. (Pune MNS)

तसेच, “19 मे रोजी मी मनसे सोडणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांत आल्या होत्या. त्यानंतर माझिरे यांची हकालपट्टी करा असं साईनाथ बाबर म्हणाले होते. तर बाबू वागस्कर यांनी तू पक्षात राहणार आहेस का ? अशी विचारणा केली होती. मला बोलावून घेऊन विचारता तुम्ही पक्षात राहणार आहात का ?” असं म्हणत हुकूमशाहीच सुरु असल्याचा आरोप माझीरे यांनी केला.

 

पुढे माझीरे म्हणाले की, “मी याबाबत वसंत मोरेंना मेसेज केला आहे, पण त्यांनी तरी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी किती वेळा बोलावं, की याच्यावर अन्याय होतोय.
मुळात मी वसंत मोरे समर्थक असल्याने माझं माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष पद काढून घेतलं का ?” असा सवाल यावेळी माझिरे यांनी केला.
तर, मी कोअर कमिटीलाच नको होतो, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला.

 

 

Web Title :- Pune MNS | pune mns leader vasant more strong supporter nilesh mazire leaves mns party

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा