Pune MNS | वसंत मोरेंनी निष्ठावंतांना डावललं, मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune MNS | आगामी निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघात (Baramati Constituency) मनसेची ताकद वाढवण्यासाठी काही दिवसांपूर्वी वसंत मोरे (Vasant More) यांनी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी वसंत मोरे यांच्या निरीक्षणाखाली भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या नियुक्तीनंतर भोर तालुक्याचे मनसेचे (Pune MNS) माजी तालुका प्रमुख राहुल पवार (Rahul Pawar) यांनी वसंत मोरे यांच्यावर गंभीर आरोप करत नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.

 

राहुल पवार यांनी सांगितले, भोर तालुक्यातील अध्यक्षाची नियुक्ती करताना वसंत मोरे यांनी निष्ठावंतांना डावलून नात्यातील निकटवर्तीयांना अध्यक्षपद दिल्याचा आरोप केला आहे.
भोर तालुक्यात अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या दिपक पांगारे (Deepak Pangare)
यांची मुलाखत वसंत मोरे यांनी मुंबईला जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या घरी घेतली, असा आरोप पवार यांनी केला आहे.

 

ते पुढे म्हणाले, सतरा वर्षे काम करुनही निष्ठेचं फळ मिळेत नसल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे.
राज ठाकरे यांना यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी राहुल पवार यांनी केली.
त्यामुळे नव्याने करण्यात आलेल्या अध्यक्ष यांच्या नियुक्त्यांनंतर पुण्यात मनसेमध्ये (Pune MNS) पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Pune MNS | rahul pawar accuses vasant more partiality in electing bhor president request raj thackeray to take action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parbhani Accident | झेंडावंदनला जाताना रील बनवणं बेतलं जीवावर, भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी

MP Sanjay Raut | ‘मविआत तणाव, मविआचा भाग व्हायचं असेल तर…’, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

Maharashtra Politics | नाशिकमधील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या वाटेवर; मंत्री दादा भुसेंनी दिल्या अनोख्या शैलीत शुभेच्छा, म्हणाले…