PMPML मध्ये मोबाईल हिसकावणारे जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पुणे स्टेशन भागात घडली. त्यांच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
यूसूफ वजीर शेख (वय २०, रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी नागणे (वय ३८, रा. सांगली) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी मूळचे सांगलीतील असून कामानिमित्त भोसरीला जाण्यासाठी पुणे स्टेशनवर पीएमपीएल बसची वाट पाहत थांबले होते. काही वेळानंतर ते बसमध्ये शिरत असताना यूसूफ आणि एका अल्पवयीन मुलानेे शिवाजी याांच्या खिशातून मोबाईल काढून पळ काढला. त्यामुळे शिवाजी यांनी आरडा-ओरड केल्यानंतर परिसरातून जाणााऱ्या बिट मार्शलने जेरबंद केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. ए. जमदाडे अधिक तपास करीत आहेत.

You might also like