मोबाईलवर बोलत असताना चोरट्यांनी मोबाईल पळविला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील वानवडी भागात पीएमपी बस स्टॉपवर 55 वर्षीय महिला मोबाईलवर बोलत जात असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली.

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निगडी येथील प्राधिकरण भागात राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या काही कामानिमित्त वानवडी परिसरात आल्या होत्या. त्या परत जाण्यासाठी फातिमानगर येथील पीएमपी बस स्टॉपवर थांबल्या होत्या. त्यांना फोन आल्याने त्या फोनवर बोलत असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.

उघड्या दरवाजातून घरफोडी
उत्तमनगर परिसरात उघड्या दरवाजातून चोरट्यानी घरात प्रवेश करून घरफोडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मिलिंद सोनटक्के यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडली असून यात 1 लाख 9 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे

You might also like