SMS पाहणार्‍याच्या हातातील मोबाईल पळविला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रस्त्याच्या कडेला उभा राहून मोबाईल पाहणार्‍या एकाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना येरवड्यात घडली. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी शांतनु मुखर्जी (वय 34) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विमाननगर परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त शनिवारी ते येरवडा येथील डब्ल्यु.एन.एस. कंपनीसमोर आले होते. रस्ता क्रॉस करत असताना त्यांना एक एसएमएस आला. त्यामुळे त्यांनी खिशातील मोबाईल काढला आणि तो पाहू लागले. त्याचवेळी पाठिमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याजवळ येऊन हातातील 15 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला. त्यांनी आरडा-ओरडा केला. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/