शिवाजी रस्त्यावर पादचार्‍याचा मोबाईल चोरला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजी रस्त्यावर पादचार्‍याच्या पिशवीतील मोबाइल चोरट्यांनी नकळत काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी निलेश अराळकर (वय 42,रा. यमुनानगर, निगडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चरोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा दिवसांपूर्वी अराळकर शिवाजी रस्त्यावरुन जात होते. चोरट्याने अराळकर यांच्या पिशवीतील आठ हजारांचा मोबाइल लांबविला. पोलीस हवालदार वंजारी तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –