रविवार पेठेतील मोबाईल शॉपी फोडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी रविवार पेठेतील मोबाईल शॉपी फोडून 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी रहुफ मेमन (वय 35, रा. गंज पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे 529 रविवार पेठेत मोबाईल केअर नावाने दुकान आहे. दरम्यान, शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून फिर्यादी घरी गेले होते. त्यांच्याकडे दुरूस्तीसाठी आलेले मोबाईल ठेवले होते. तसेच, दुरूस्तीचे व किरकोळ विक्रीचे साहित्य होते. तर, कपाटात 30 हजार रुपयांची रोकड ठेवली होती.

दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच, चोरट्यांनी दुकानातील रोकड आणि 5 मोबाईल असा एकूण 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. रविवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी फिर्यादी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/