पुण्यातील सिंहगड रोडवरील बसस्टॉपवर शाळकरी मुलीशी अश्लील वर्तन, दोघांना अटक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – महिला अत्याचार्‍याच्या घटनांनी देशभर गोंधळ उडाला असताना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात बस स्टॉपवर थांबलेल्या दोन शाळकरी मुलांशी अश्लील वर्तनकरून त्यांचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.
गणेश महेंद्र गुडुळी (वय 19) व आकाश यादव म्हेत्रे (वय 19, रा. हिंगणे खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिडीत तरुणी येथील एका शाळेत आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी पिडीत मुलगी आणि तिची मैत्रिण दुपारी हिंगणे खुर्द येथील पीएमटी बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी दोघेजन दुचाकीवर तेथे आले. मुली पायी चालत निघाल्यानंतर त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर काही अंतर गेल्यानंतर गणेश याने मुलीचा हात पकडला. यामुळे मुलींच्या मनात भिती बसली. त्या तेथून गेल्यानंतर त्यांनी पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

दुचाकीस्वार टोळक्यांचा हैदोस…
शहरातील उपनगर तसेच आसपासच्या परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांजवळ दुचाकीवर येऊन डांगडिंग करणार्‍या तरुणांचा भयंकर त्रास विद्यार्थिनींना सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुलांमध्ये देखील वादावादी होत असल्याचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार सरास घडत आहेत. उपनगरांमध्ये हे प्रमाण लक्षणीय असून, याकडे वेळीच पोलिसांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. महिला अन तरुणांसाठी असणारे दामिनी पथक नेमक कुठे असते असाही प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.