Pune : मेट्रोबाधित झोपडपट्टीतील रहिवाशांचे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   महामेट्रो कार्यालयालवर काळ्या फिती लावून आज आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. मेट्रोबाधित झोपडपट्टीतील नागरीकांशी चर्चा न करता कामगार पुतळा झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा परस्पर निर्णय घेत आदेश दिल्याप्रकरणी हे आंदोलन सुरू आहे.

कामगार पुतळा झोपडपट्टी परिसरातील रहिवासी आक्रमक झाले आहेत .1974 मध्ये घोषित झालेल्या झोपडपट्टीतील नागरीकांचे शहराच्या मध्यवर्ती भागातून 14 किलोमीटर बाहेर लोहगाव परिसरात पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याला कामगार पुतळा झोपडपट्टीवासियांचा विरोध आहे.

प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात महामेट्रो, महापालिका प्रशासनाचा निषेध करत रहिवासी घराबाहेर येऊन घोषणाबाजी करत आहेत. निर्णय रद्द झाला नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशारा रहिवाश्यांना दिला आहे.