गिरीश बापटांच्या उमेदवारीवर खासदार अनिल शिरोळे म्हणतात…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील कोट्यवधी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मी एक कार्यकर्ता आहे. पुण्याच्या लोकसभा उमेदवारीवर माझ्या पक्षाने घेतलेला निर्णय मला मान्य आहे. आता आम्ही सर्व गिरीश बापट यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराला सुरुवात करणार आहे. अशी प्रतिक्रिया भाजपने तिकीट कापल्यानंतर खासदार अनिल शिरोळे यांनी दिली आहे.

मी १९९२ पासून भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. नगरसेवक, महानगरपालिकेत विरोधी पक्षनेता, भाजप शहराध्यक्ष आदी पदे मला पक्षाने दिली आहेत. त्याच प्रमाणे २०१४ साली मला भाजपने खासदार होण्याची संधी दिली. आता पक्षाने जो आदेश दिला आहे तो मला पूर्णतः मान्य आहे. पक्षाने गिरीश बापट यांना उमेदवारी दिली असून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. असे अनिल शिरोळे यांनी म्हणले आहेत. भाजपने आधीच संकेत दिल्याप्रमाणे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट कापले आहे.

पुण्यातील अनेक कामे मी केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्गी लावली. मात्र पक्ष काय विचार करतो हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती होत आहे. ११ कोटी भाजप कार्यकर्त्यांपैकी मी एक आहे. त्यामुळे या पुढे ही कार्यकर्त्याच्या वृत्तीने काम करत राहणार, असे अनिल शिरोळे यांनी म्हणले आहे.