Pune MSEDCL | पुण्यातील लोणीकंद, वाघोली, मांजरीसह ‘या’ परिसरात रविवारी वीजपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune MSEDCL | महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब लोणीकंद 400/220/22 केव्ही उपकेंद्रातील तातडीचे अत्यावश्यक दुरुस्ती काम करण्यात येणार असल्याने रविवारी (दि. 26) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लोणीकंद (Lonikand), वाघोली (Wagholi), मांजरी (Manjari), फुलगाव (Phulgaon), आवलवाडी (Avalwadi)  व इतर परिसरात वीज पुरवठा बंद (Power Off) राहणार आहे. याबाबत संबंधित वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे माहिती (Pune MSEDCL) देण्यात येत आहे.

 

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या अतिउच्चदाब (Pune MSEDCL) लोणीकंद 400/220/22 केव्ही उपकेंद्र मध्ये अत्यावश्यक तांत्रिक दुरुस्तीचे काम करणे तातडीचे असल्याने रविवारी (दि. 26) ते करण्यात येत आहे.
या दुरुस्ती कामामुळे महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या एकूण 6 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल.

 

त्यामुळे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लोणीकंद, वाघोली, मांजरी, फुलगाव, आवलवाडी, संघर वेअर हाऊस
व इतर परिसर, तुळापूर, भावडी, जगताप वस्ती, बायफ रोड, लोहगाव रस्ता, आवलवाडी रस्ता, साई सत्यम पार्क,
उबले नगर परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.
या अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

Web Title :-  Pune MSEDCL | Power supply to Lonikanda, Wagholi, Manjari areas in Pune will be cut off on Sunday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Traffic | लेकटाउन येथील कल्व्हर्टच्या कामामुळे कात्रज, सुखसागरनगरमध्ये वाहतुकीची अभुतपूर्व कोंडी

 

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने आलिया, कतरीना, दीपिकाला पाजले पाणी, ‘या’ बाबतीत केली मात!

 

Maharashtra Political Crisis | रात्रीच्या अंधारात शिंदे अन् फडणवीसांची भेट ? पुढील प्लान आखल्याची चर्चा