Pune Mula-Mutha Riverfront Development Project | मुळा – मुठा नदीकाठ सुधार योजनेतील दोन स्ट्रेच ‘मॉडेल’ म्हणून विकसित करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mula-Mutha Riverfront Development Project | नदीकाठ सुधार अर्थात रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या निविदा प्रक्रिया (Mula Mutha Riverfront Development Tender Process) राबविलेल्या दोन फेजमधील अनुक्रमे २०० आणि २५० मीटर स्ट्रेचचा ‘मॉडेल’ (Model) म्हणून येत्या काही महिन्यांत विकास केला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेतील Pune Municipal Corporation (PMC) अधिकार्‍यांनी दिली. (Pune Mula-Mutha Riverfront Development Project)

 

मुळा- मुठा नदी काठ सुधार योजनेतील ११ पैकी पहिल्या दोन टप्प्यातील निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. ६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तसेच पर्यावरण प्रेमी संघटनांनी या प्रकल्पावर आक्षेप नोंदविल्यानंतर राज्य शासनाने यावर उच्चस्तरीय समिती नेमून पर्यावरण प्रेमी संघटनांचे आक्षेप आणि सूचना नोंदवून घेतल्या आहेत. महापालिकेने हे आक्षेप आणि सूचनांवर लिखित स्पष्टीकरणही समितीला पाठविले आहे. समितीच्या आगामी बैठकीमध्ये ती बैठकीतील सदस्यांपुढे येतील. (Pune Mula-Mutha Riverfront Development Project)

 

दरम्यान, या प्रकल्पाच्या कामासाठी संबधित ठेकेदारांनी तांत्रिक कामेही सुरू केली आहेत. महापालिका प्रशासनाने नुकतेच आढावा बैठक घेउन संगमवाडी ते बंडगार्डन (Sangamwadi To Bundgarden) या पहिल्या टप्प्यातील कामापैकी येरवडा (Yerwada) येथील शादलबाबा दर्ग्यामागील (Shadal Baba Dargah) २०० मी. चा नदी काठ तसेच दुसर्‍या टप्प्यातील कोरेगाव पार्क ते कल्याणीनगर (Koregaon Park To Kalyani Nagar) दरम्यानच्या सुमारे २५० मी. नदी काठचा ‘मॉडेल’ म्हणून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करत असताना जायका कंपनीच्या नदी सुधार योजनेतील कामेही करून घेतली जाणार आहेत. यानंतर नदीकाठ सुधार योजनेतील नदीच्या काठावर पिचिंग, पायथ्याशी भिंत, पिचिंग केेेलेला भाग वाहून जावू नये यासाठी जाळी, तसेच मधल्या टप्यावर सायकल ट्रॅक, वरिल बाजूस रस्ता, वृक्षारोपण व सुशोभीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी (PMC Officer) दिली.

मुळा – मुठा नदीकाठ सुधार योजनेत मंजूर केलेल्या दोन्ही टप्प्यातील अनुक्रमे २०० व २५० मी. चा भाग ‘मॉडेल’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
येत्या काही महिन्यांत हे काम करण्यात येईल.
या मॉडेलवर नागरिक तसेच तज्ज्ञांच्या सूचना घेउन या योग्य त्या सूचनांचा अंतर्भाव करूनच पुढील उर्वरीत प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे.

कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे महापालिका (Kunal Khemnar, Additional Municipal Commissioner, Pune Municipal Corporation)

 

 

Web Title :- Pune Mula-Mutha Riverfront Development Project | Mula Mutha will develop two stretches as a model in the river Riverfront Development Project

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा