आजच्या बंदमधून पुणे, मुंबई वगळले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेल्या आंदोलनात सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र, या बंदमधून पुणे, मुंबई वगळण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात असलेले वारकरी आज परतीच्या वाटेवर असणार आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात बंद पाळण्यात येणार आहे. बुधवारी मुंबईत बंद पाळण्यात येणार असल्याचे मराठा मूक मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले आहे.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f778d3ff-8ef6-11e8-a7be-e14b663a703a’]

आधी निश्चित करण्यात आल्याप्रमाणे बंदमुळे उद्या घराकडे निघालेल्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मुंबई, पुण्यातील बंद एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, बंद हा शांततेत पाळण्यात येणार असून या काळात एसटी बसेसना लक्ष्य करण्यात येऊ नये, असे आवाहनही मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीकडून आंदोलकांना करण्यात आले आहे.