पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कारची ट्रकला धडक, २ ठार १ जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कामशेत बोगदयाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगातील टाटा इंडिका कारने (एमएच १४ जीएच ८२३९) मागून धडक दिली. यामध्ये एका जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला रुग्णालयात नेताना रस्त्यात मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (मंगळवार) दुपारी सव्वातीनच्या सुमारास झाला.
[amazon_link asins=’B01N4J3WAE,B0073C7IIK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cacc59c0-b042-11e8-9d28-9d1159d5c3e5′]

मारुती भाऊ थोरात (वय-७०) आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर कार चालक जखमी झाला असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका कंटेनरला (एमएच ४६ एएफ ०४१०) पाठिमागून धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. जखमीवर निगडी येथील लोकमान्य हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक काही वेळाकरीता विस्कळीत झाली होती. पुढील तपास कामशेत पेलीस करीत आहेत.

वीस हजारांची लाच घेताना पोलीस पाटील एसीबीच्या ताब्यात