अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला अपघात

पुणे:पोलिसनामा ऑनलाईन
‘मस्का’ या मराठी चित्रपटातील अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या मोटारीला लोणावळ्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात प्रार्थनाचा हात फ्रॅक्चर झाला असून तिच्या डोक्यालाही मार लागला आहे. अनिकेत, प्रार्थना आणि तिची मैत्रीण हे तिघेही कोल्हापूरला ‘मस्का’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निघाले होते.

आज सकाळी आठच्या दरम्यान अनिकेतच्या कारचा आणि टेम्पोचा भीषण अपघात लोणावळ्याजवळ मुंबई-पुणे महामार्गावर झाला. हायवेवर थांबलेल्या टेम्पोजवळून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अनिकेतच्या गाडीने टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेत काराचा चेंदामेंदा झाला . प्रार्थनाच्या हाताला आणि डोक्याला मार लागल्यामुळे तिला उपचारासाठी वळवणमध्ये दाखल करण्यात आले आहे. “हा अपघात भयंकर होता ,कारचा चेंदामेंदा झाला आहे. पुढे दरी होती देवाच्या कृपेमुळे आम्ही थोडक्यात बचावलो, “असे अभिनेता अनिकेतने सांगितले.