पुणे-मुंबई Express-Way मंगळवारी अर्धातास बंद

पुणे : पोलीसनामा ऑनालाइन- महावितरणची केबल टाकण्याच्या कामासाठी उद्या (मंगळवार) पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे अर्ध्यातासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात येणार आहे. परंदवाडी येथे महावितरणचे केबल टाकण्याचे काम होणार असल्याने दुपारी एक ते दीड या वेळेत पूर्ण रस्ता बंद करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून या केबलचे काम प्रस्तावित असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. या कालावधीमध्ये परंदवाडी येथून अर्धा किलोमिटरवर अवजड, मालवाहतूक आणि हलकी वाहने थांबविण्यात येणार आहे. तर मुंबईकडे जाणारी हलकी आणि प्रवासी वाहने ही किवळे पुलापासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळविण्यात येणार आहेत.

तसेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहने उर्से टोल नाक्यापासून जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून वळविण्यात येणार आहे. तरी वाहन चालाकांनी दुपारी एक ते दीड जुन्या महामार्गाचा वापर करवा असे आवाहन पुणे विभागाचे महामार्गचे पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी केले आहे.
आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग