Pune Mumbai Expressway | पुणे मुंबई हायवेवर लोखंडी साहित्य घेऊन जाणारा कंटेनर उलटला; पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक खोळंबली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्याहून मुंबईच्या दिशेने लोखंडी साहित्य घेऊन जाणारा कंटेनर उलटल्याने पुणे-मुंबई महामार्गावर (Pune Mumbai Expressway) वाहतूक ठप्प (Traffic jam) झाली आहे. कंटेनरमधील लोखंडी साहित्य महामार्गावर पडल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हा अपघात घाट परिसरात आज (शनिवार) दुपारच्या सुमारास झाला असून महामार्गावरील (Pune Mumbai Expressway) साहित्य बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने लोखंडी सामान घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाचे अमृतांजन ब्रिज जवळील घाट परिसरात गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर महामार्गावर उलटला.
कंटनेरमध्ये असलेले लोखंडी साहित्य महामार्गावर पडल्याने पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
महामार्गावर दोन ते तीन किलोमिटरच्या रांगा लागल्या आहेत. तर वाहन चालकांनी आपली वाहने मुंबई लेनच्या दिशेने वळवल्याने मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक मंदावली आहे.

महामार्ग पोलिसांनी (Highway police) दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरमधील लोखंडी साहित्य महामार्गावर पडल्याने पुणे-मुंबई लेनवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
त्यातच मुसळधार पाऊस पडत असल्याने मदत कार्यात विलंब होत आहे.

 

Web Title : Pune Mumbai Expressway | Container carrying iron overturned on Pune-Mumbai highway; Traffic from Pune to Mumbai was disrupted

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Traffic police | राज्यातील 10 लाख वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नोटिसा

Pune Police | पुणे पोलिसांकडून ‘माझी रिक्षा-सुरक्षित रिक्षा’ स्पर्धेचे आयोजन; मिळणार रोख बक्षिसे अन् बरंच काही… (व्हिडीओ)

Municipal Corporation Election | प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी, कोणाशी आघाडी करायची याचा निर्णय स्थानिक नेते घेतील – अजित पवार (व्हिडीओ)