×
HomeशहरपुणेPune Mumbai Expressway | ...म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 28 डिसेंबरला दोन तास...

Pune Mumbai Expressway | …म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 28 डिसेंबरला दोन तास ‘ब्लॉक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune Mumbai Expressway) मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील ‘ओव्हरहेड गँट्रीस्ट्रक्चर’वर संदेश फलक बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे हे काम करण्यासाठी द्रुतगती महामार्गावर (Pune Mumbai Expressway) २८ डिसेंबरला दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक’ केला जाणार आहे, असे राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (maharashtra road development corporation) सांगण्यात आले.

महामार्ग सुरक्षा पथकाच्या (Highway Traffic Police) HSP पुणे विभागाचे पोलीस निरीक्षक सजन एच. सस्ते (Police Inspector Sajan H. Saste) यांनी दिलेल्या माहितीनुसार, फलक बसवण्याचा कामासाठी मुंबईला जाणारी रस्त्यावरील दोन मार्गिका बंद करून एकाच मार्गावरून वाहने जाऊ दिली जातील. या नियोजित वेळेत सर्व अवजड व मालवाहतूक वाहनांना प्रवास करता येणार नाही. हलकी चार चाकी व इतर प्रवासी वाहने एका मार्गिकेवरून संथ गतीने जातील. यावेळी सर्व अवजड व माल वाहतूक करणारी वाहने कामापूर्वी थांबविण्यात येणार आहेत. हलकी चारचाकी तसेच इतर प्रवासी वाहने एका मार्गिकेवरून संथगतीने सोडण्यात येणार आहेत.

Web Title  :  two hour block pune mumbai expressway next week date 28 dec 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Must Read
Related News