Pune Mumbai Expressway | अपघात रोखण्यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर विविध उपाययोजना; विधानपरिषदेत फडणवीस यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mumbai Expressway | पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर लेनच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) आणि आयआरबीकडून (IRB) वाहनांच्या वर्गवारीनुसार लेनदर्शक फलक लावणे, अवजड वाहनांना पहिल्या आणि दुसऱ्या लेन मधून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याचसह द्रुतगती मार्गावर ज्या ठिकाणी अवजड वाहने लेन शिस्तीचे उल्लंघन करण्याची शक्‍यता असते त्या ठिकाणी पोलिस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी विधानपरिषदेमध्ये दिली. (Pune Mumbai Expressway)

 

विधानपरिषदेमध्ये द्रुतगती महामार्गावर लेनच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांना आळा घालण्याबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. (Pune Mumbai Expressway)

 

फडणवीस म्हणाले, ‘पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर रस्ता रुंदी करणाचे काम चालू असून ब्लास्टींग वेळी पुणे-मुंबई व मुंबई -पुणे अशा दोन्ही लेन वाहतुकीकरिता बंद करण्यात येतात. परिणामी या महामार्गावर वाहतूक कोंडी होत असते. तसेच महामार्गावर अवजड वाहनांचे प्रमाण जास्त वाढलेले असून परिसरात चढावर अवजड वाहने बंद पडल्यास वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
द्रुतगती महामार्गावर वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने तीव्र उतार असल्यामुळे वाहनांचे अपघात झालेले आहेत.
गेल्या दोन महिन्यात छोट्या वाहनांचे अपघात वाढलेले नाहीत.
लेनच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांवर विशेष मोहिम अंतर्गत मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात येते.
ओव्हरस्पीडमुळे अपघात होऊ नये यासाठी या मार्गावर CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत.’

 

Web Title :- Pune Mumbai Expressway | Various measures on Pune-Mumbai Expressway to prevent accidents; Information about Devendra Fadnavis in Legislative Council

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune DPDC News | डीपीडीसीकडून आरोग्य सुविधांसाठी 12 कोटी 68 लाखांचा निधी

 

Pravin Darekar | भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल ! ‘शिवसेनेनं 25 वर्षे मुंबई गिळली, मुंबईकरांना काय दिलं याचं उत्तर द्या’

 

Devendra Fadnavis | ‘या’ तारखेपासून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती