Pune-Mumbai Green Corridor | पुण्यातील ब्रेन डेड महिलेनं दिल दोघांना जीवदान; ग्रीन कॉरिडॉरमुळे 83 मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनाइलन – Pune-Navi Mumbai Green Corridor News | पुण्यातून नवी मुंबईला (Pune-Mumbai) जायच म्हंटल तर साधारण साडेतीन चार तासांचा वेळ लागतो. परंतु, ग्रीन कॉरिडॉरमुळे (Green Corridor) हे अंतर अवघ्या 83 मिनीटांत पार करुन नवी मुंबईतील एका रुग्णालयात मानवी हृदय (human heart) पोहोचवण्यात आले. यामुळे एका रुग्णाला नवजीवन मिळाले आहे. संबंधित रुग्णावर दीड तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करत मानवी हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. पुण्याहून मुंबईला वेळेत मानवी हृदय पोहोचल्याने रुग्णाचे प्राण वाचले.

मुंबईतील रहिवासी असणाऱ्या रवीन शर्मन अहिरवार (वय-29) या तरूणावर बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital Belapur) उपचार सुरू होते. त्याला हृदय प्रत्यारोपणाची तातडीची गरज होती. पण मानवी हृदय दान करणारा व्यक्ती मिळत नव्हता. दरम्यान, पुण्यातील जहांगीर रुग्णालयात (Jehangir Hospital Pune) एका महिलेला ब्रेन डेड (Brain dead) घोषित करण्यात आल्याने तिचे हृदय आणि यकृत दान करण्यात आल होतं.

पुणे ते मुंबई ग्रीन कॉरिडॉर

पुण्यातील एका रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर रवीन अहिरवार यांना हृदयाची
आवश्यकता असल्याची माहिती मिळाली. बेलापूरमधील अपोलो रुग्णालय ते पुण्यातील जहांगीर रुग्णलय हे
अंतर साधारण साडेतीन ते चार तासाचे असून लवकरात लवकर हे अंतर कापून पुण्यातील महिलेचं हृदय नवी
मुंबईला पोहोचवणं गरजेचं होत. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला.

83 मिनिटांत पुणे ते बेलापूर

यामुळे अवघ्या 83 मिनिटांत हे अंतर कापून बेलापूर येथे हे हृदय पोहोचवण्यात आले. संबंधित रुग्णावर दीड तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करत मानवी हृदयाचे प्रत्यारोपण (Heart transplant) करण्यात आलं आहे. पण वेळेवर मानवी हृदय पुण्याहून मुंबईला पोहोचल्यामुळे संबंधित रुग्णाचा जीव वाचला आहे. केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत हृदय मुंबईत पोहोचवल्यानं हे शक्य झालं आहे. अनेकांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांच (Health workers) कौतुक केले.

हे देखील वाचा

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Mumbai Rains | मुंबईकरांसाठी काळरात्र ! पावसामुळे 25 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख तर मोदी सरकारकडून 2 लाखाची मदत जाहीर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune-Mumbai Green Corridor | brain dead woman save life of two human heart reached mumbai from pune in just 83 minutes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update