Pune-Mumbai Highway Accident | पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मत्यू

मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – Pune-Mumbai Highway Accident | पुणे- मुंबई महामार्गावरील कामशेत (Kamshet) गावच्या हद्दीतील जुना मुंबई महामार्गावरील (Old Pune-Mumbai Highway) कामशेत खिंडीत (Kamshet Khind) सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. हा अपघात पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास (Pune-Mumbai Highway Accident) झाला. यामध्ये कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

राजेंद्रकुमार देवेंद्रकुमार जैन Rajendrakumar Devendrakumar Jain (वय-44 रा. कळवा, ठाणे), औतार गुरुदयाल सिंग सेहेरा Avatar Gurdial Singh Sehra (वय-50 रा. कोपरी, ठाणे) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर नितेशकुमार देवेंद्रकुमार जैन (Nitesh Kumar Devendra Kumar Jain) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai Highway Accident) सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास मुंबईकडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या लाकूड वाहतूक (Timber Transport) करणारा कंटेनर हा कामशेत खिंड (Kamshet Khind) उतरत होता. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे लेनवर (Pune Lane) पलटी झाला. व कंटेनर मधील सर्व लाकडे मुंबई लेनवर (Mumbai Lane) पडली. त्याचवेळी पुणे कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मारुती कार ही महामार्गावर पडलेल्या लाकडांना वेगात येऊन धडकली. यामध्ये कारमध्ये पुढे बसलेले राजेंद्रकुमार व औतार यांचा जागीच मृत्यू झाला. मागील सीटवर बसलेले नितेशकुमार या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कामशेत येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

अपघाताची माहिती सजताच पोलीस हवालदार समीर शेख व पोलीस नाईक अनिल हिप्परकर, सुनिल गवारी, सचिन निंबाळकर,
केकेआर रुग्णवाहिकेचे चालक कैसर शेख, स्वप्नील मोकाशी यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन जखमीला रुग्णालयात दाखल केले.
या अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी (Traffic Jams) झाली होती.
पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने व लाकडे बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

Web Title : Pune Mumbai Highway Accident | accident on pune mumbai highway two died on the spot one seriously injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharti Singh Good News | सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस बाळाला जन्म..!

 

Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांचे पुण्यात निधन

 

Neetu Singh Kapoor Viral Dance Video | वयाच्या 63 व्या वर्षी नितू कपूरनं दिली चक्क नोरा फतेहीला टक्कर,
डान्स पाहून तुम्हीही होताल थक्क !