Pune-Mumbai Railway । प्रदीर्घ कालावधीनंतर पुणे-मुंबई ‘डेक्कन क्वीन’ शनिवारपासून धावणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलेली पुणे-मुंबई डेक्कन क्वीन (Pune-Mumbai Deccan Queen) पुन्हा बंद करण्यात आली. त्या काळात अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. मात्र, आता दीर्घ कालवधीनंतर पुन्हा एकदा डेक्कन क्वीन धावण्यास सज्ज झाली आहे. शनिवारपासून पुणे ते मुंबई (26 जून) डेक्कन एक्सप्रेस (Deccan Express) व डेक्कन क्वीन (Deccan Queen) एक्सप्रेस सुरू होत आहे. तसेच, प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पहिल्यांदाच विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. Pune-Mumbai Railway Deccan Queen and Deccan express to resume services from June 26

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

लग्नाचे आमिष दाखवून 31 वर्षीय महिलेवर बलात्कार; कोंढव्यात FIR

‘डेक्कन क्वीन’ (Deccan Express) गेल्या महिन्यात बंद झाली होती.
त्यामुळे शेकडो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
नोकरीनिमित्त येणाऱ्या-जाणाऱ्यांचे हाल झाले.
त्या प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आलीय.
त्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा बंद केली होती.
दरम्यान, ऑक्टोबरपासून पुणे-मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन (Pune-Mumbai Deccan Queen) सुरू करण्यात आली होती.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डेक्कन क्वीन बंद करण्यात आलाय.
मात्र, आता प्रवाशांची गैरसोय होणे थांबणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

LIC : दररोज 200 रुपये भरा अन् 28 लाख मिळवा, जाणून घ्या

पुणे-मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन (Deccan Queen) एक्सप्रेस ही 25 जून रोजी मुंबईहुन दुपारी 5 वाजून 10 मिनिटांनी निघेल. पुण्याला रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी पोहचेल.

डेक्कन एक्सप्रेस (Deccan Express) मुंबईहुन सकाळी 7 वाजता निघेल. पुण्याला 11 वाजून 5 मिनिटांनी पोहचेल. तर हीच गाडी पुण्यातून दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी निघेल. मुंबईला संध्याकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी पोहचेल.

Web Titel : Pune-Mumbai Railway Deccan Queen and Deccan express to resume services from June 26 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder News | चाकूने सपासप वार करत भरबाजारातच पतीने पत्नीचा केला खून, जळगाव जिल्ह्यातील घटना