पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर ‘मेगा ब्लाॅक’ ; प्रगती, सिंहगड एक्स्प्रेस ८ दिवस रद्द

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या मुंबईत जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. याशिवाय पुणे – मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक दुरुस्ती आणि इतर कारणांमुळे ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या लोणावळा ते कर्जत दरम्यान दुरुस्तीचे काम होणार असल्याने २६ जुलै ते ९ ऑगस्ट या दरम्यान वाहतूक बंद असणार आहे. यामुळे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. कोणत्याही अनुचित समस्या निर्माण होऊ नये म्हणून ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे मुंबई रेल्वे सेवा ८ दिवस बंद –
यामुळे मुंबई – पुणे मार्गावर सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. कारण या दोन्ही गाड्या जवळपास ८ दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय १३ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले असून या गाड्या पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून पुढे धावणार आहेत. याशिवाय सह्याद्री, महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोयना या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले असून मुंबईहून निघणाऱ्या या गाड्या पुण्याहून सुटणार आहेत.

पुणे – पनवेल – पुणे शटल सेवा रद्द –
तसेच पुणे – पनवेल – पुणे शटल सेवा सुद्धा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. तसेच भुसावळ गाडी मनमाड मार्गे धावणार आहे. रेल्वे प्रवाशांना रेल्वेने पर्यायी मार्गाचा वापर करा अशी विनंती केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –