Pune Mundhwa Keshav Nagar Crime | गाव गुंडांवर ठोस कारवाई आवश्यक ! सर्व नागरिकांनी एकत्र येऊन उपाययोजना करु, मुंढवा-केशवनगर मधील नागरिकांचा सूर

पुणे : Pune Mundhwa Keshav Nagar Crime | मुंढवा-केशवनगर परिसरात गुन्हेगार टोळक्याची दहशत वाढली आहे. यावर काय उपाययोजना करता येईल यासाठी येथील ग्रामस्थांची मुंढवा येथील भैरवनाथ मंदिरामध्ये शुक्रवारी सायंकाळी बैठक पार पडली. (Pune Mundhwa Keshav Nagar Crime)

आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांच्यासह मुंढवा-केशवनगर येथील अनेक नागरिक या वेळी उपस्थित होते. येथील गाव गुंडांवर (हातात लोखंडी हत्यारे घेवून दहशत निर्माण करणार्‍यांवर) ठोस कारवाई होण्याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते यांच्यापर्यंत पाठपुरावा करु असे आश्वासन आमदार तुपे यांनी या वेळी दिले.

गुन्हेगार टोळक्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
यावर या बैठकीत नागरिकांचे एकमत झाले. येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काय-काय करता येईल यावर नागरिकांनी आपली मते व्यक्त केली. गुन्हेगार टोळक्यावर (कोयता गँग) तसेच इतर चुकीच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात पोलिस अपयशी (Pune Police) ठरत असल्याची भावना या बैठकीत अनेकांनी व्यक्त केली. यापुढील बैठक मुंढवा पोलिस स्टेशन (Mundhwa Police Station) येथे आयोजित करुन योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात नियोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Web Title :-   Pune Mundhwa Keshav Nagar Crime | Concrete action is necessary against the village thugs! All the citizens should come together and take measures, the voice of the citizens of Mundhwa-Keshavnagar

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPS Vishwas Nangare Patil | आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आवाहन; म्हणाले – ‘माझ्या नावाने बनावट खातं, सावध रहा’

Pune Crime News | मैत्रिणीनेच मैत्रिणीला घातला 69 लाखांचा गंडा ! काका पोलीस असल्याचे सांगून धमकाविले, पोलिस कर्मचार्‍यासह 6 जणांवर फसवणूकीचा गुन्हा