Pune Mundhwa Police | ‘इमानदार’ रिक्षा चालकाने पोलिस ठाण्यात जमा केला 1 लाख 10 हजाराचा ऐवज; मुंढवा पोलिसांकडून रिक्षा चालकाचे कौतुक अन् सत्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mundhwa Police | कलयुगामध्ये झटपट पैसा मिळविण्यासाठी स्पर्धा लागलेली असतानाच एका रिक्षाचालकाने इमानदारीचे उदाहरण जनतेसमोर ठवले आहे. रिक्षामध्ये सापडलेली बॅग आणि त्यामध्ये असेलेला 1 लाख 10 हजार रूपयाचा ऐवज रिक्षा चालकाने मुंढवा पोलिस ठाण्यात जमा करून कलयुगात देखील इमानदारी जिवंत असल्याचे दाखवुन दिले आहे. (Pune Mundhwa Police)

नवनीत लाल गुगळे (सध्या रा. खराडीगाव, पुणे. मळ रा. नेवासा, जि. अहमदनगर) असे त्या इमानदार रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांचा मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी (Sr PI Mahesh Bolkotgi) यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रिक्षा चालक नवनीत गुगळे हे खराडी ते हडपसर असे भाडे घेवून जात असताना मुंढवा ओव्हरब्रिजवर त्यांना एक लेडीज बॅग मिळून आली. त्यांनी कोणताही लोभ न करता सदरची बॅग अिणि त्यामध्ये अ‍ॅपल कंपनीचा लॅपटॉप, चार्जर, मोबाईल चार्जर, आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड, गाडीचे आरसी बुक आणि इतर महत्वाचे कागदपत्रे असा एकुण 1 लाख 10 हजार रूपयाचा ऐवज मुंढवा पोलिस ठाण्यात जमा केला.

बॅगमध्ये असलेल्या आरसी बुकवरील आरटीओ नंबरवरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बाळकोडगी यांनी वाहन मालकाचे नाव आणि मोबाईल नंबर प्राप्त करण्याच्या सुचना सहाय्यक पोलिस फौजदार रमेश उगले यांना दिल्या. सदरील माहिती प्राप्त करून पोलिसांनी ममतोष प्रकाश (रा. पटना) यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी त्यांची मुलगी माही मुस्कान ही अ‍ॅमेनोरा सिटी येथे राहण्यास असून ती गाडी वापरत असल्याचे सांगितले.

मुंढवा पोलिसांनी माही मुस्कान यांच्याशी संपर्क साधून त्याला सर्व ऐवज परत केली.
माही मुस्कान यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले तसेच कौतुक देखील केले आहे.

पोलिस आयुक्त अतितेश कुमार, सह आयुक्त प्रविण पवार, अप्पर आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उपायुक्त आर. राजा, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांच्या सुचनेप्रमाणे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहाय्यक पोलिस फौजदार रमेश उगले, पोलिस अंमलदार निलेश पालवे,
सचिन अडसुळ आणि इतर कर्मचार्‍यांनी ही कामगिरी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | गणेशजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम’ ! ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून आयोजन’

Nashik Crime News | किरकोळ वादातून लोखंडी रॉडने हल्ला करुन रिक्षाचालकाचा खून

पिंपरी : खोटी बिले देऊन कंपनीला 24 लाखांचा गंडा, दोन कर्मचाऱ्यांवर FIR

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट

Pune Lonikand Crime | भावजयीचा भावाच्या मदतीने खून करणार्‍यास लोणीकंद पोलिसांकडून अटक

Muder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजजवळ महिलेचा खून