Pune Mundhwa Police | पार्कींग केलेल्या रिक्षांचे डिस्कटायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mundhwa Police | मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिमनगर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांनी रोडच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षांचे डिस्कटायर चोरून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 22 फेब्रुवारी रोजी घडला होता. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह साठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Pune Mundhwa Police)

वाजिद युनूस अन्सारी (वय-22 रा. सय्यदनगर, हडपसर), झैद जावेद शेख (वय-22 रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी सहा रिक्षांची समोरील तसेच मागील बाजुची एकूण 10 डिस्कसह टायर चोरून नेले होते. याबाबत मुंढवा पोलिसांनी आयपीसी 379, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत पाहून संशयित आरोपींची माहिती काढून आरोपींचा शोध सुरु केला.
त्यावेळी तपास पथकातील पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा करणारे आरोपी
हडपसर-मुंढवा रोडवरील ब्रीजखाली येणार आहेत. त्यानुसार तपास पथकाने याठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा,
10 डिस्कटायर, 1 स्टील टायर खोलण्याचा पाना असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास पोलीस अंमलदार राकेश बोबडे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक
विभाग मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्वीनी राख
यांच्या सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर,
सहायक पोलीस फौजदार संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, राहुल मोरे, राकेश बोबडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Maharashtra Govt | ‘सरकारने शिष्टमंडळ पाठवून फसवणूक केली, महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू’ – मनोज जरांगे

PM Modi Yavatmal Visit | PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ जिल्ह्यात महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रम, PM Kisan च्या १६ व्या हप्त्याचे वितरण करणार

Amit Shah On Uddhav Thackeray | अमित शाह यांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका, उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते…

Sanjay Raut On Amit Shah | अमित शहांच्या घराणेशाहीच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर, ”जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारलेत का?”